मुंबई | तू मोठा स्टार असशील म्हणून काय संपूर्ण अलिबाग विकत घेतलंयस का?, अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला चांगलच सुनावलं.
शाहरूख खान वाढदिवसानिमित्त अलिबागच्या फार्म हाऊसवर गेला होता, मुंबईला परतताना चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे शाहरूखची बोट पार्क होईपर्यंत मुंबईहून अलिबागला निघालेल्या जयंत पाटलांना वाट पाहावी लागली.
शाहरूख खानला अनपेक्षितपणे जयंत पाटलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
Comments are closed.