बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मासा पाण्याबाहेर काढल्यावर तडफडतो तशीच विरोधकांची अवस्था झालीये”

मुंबई | सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली होती. याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो तडफडतो. सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची अवस्था तशीच झाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात. राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू होते आणि कधी आम्ही सत्तेत येतो असं विरोधकांना झालं आहे, असा टोला जयंत पाटलांनी लगावला.

राष्ट्रपती राजवट लागू करायचीच झाली तर आधी उत्तर प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यात लावावी लागेल, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोपं नाही, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मनसुख हिरेन प्रकरणावर देखील भाष्य केलं. एनआयएने एखाद्या घटनेचा तपास केला पाहिजे. पण तपास यंत्रणांनी तपासाची माहिती बाहेर येऊ देऊ नये. ज्या पद्धतीने बातम्या सोडल्या जात आहेत, त्यामुळे समाजात चुकीची आणि अर्धवट माहिती जात आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण!

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाताना 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More