बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने करभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

अमरावती | आमचा कारभार उत्तम सुरू आहे. आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे विरोधकांनी लावालावी करू नये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील हे अमरावतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली.

शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने वारंवार पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते, असं जयंत पाटील म्हणाले.

आज देशातील सर्व शेतकऱ्यांची सहानुभूती दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मात्र हे आंदोलन बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“70 दिवसांपासून मुग गिळून गप्प बसलेले आता तोंडं उघडायला लागलेत”

अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, तुम्ही पाहणार का???

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक, म्हणाली…

यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला ‘हा’ गंभीर आरोेप!-

“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More