Top News महाराष्ट्र मुंबई

फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

मुंबई  |  कोरोनासारख्या संकटाच्या परिस्थितीत विरोधक सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं, मात्र ते सरकार अस्थिर करण्याच्या मागे लागले आहेत. भाजपचा असा आरोप आहे की राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. पण फडणवीसजी महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने केलेल्या मदतीची आकडेवारी दिली, ती चुकीची आहे. केवळ आकडेवारी सांगण्यापेक्षा राज्य सरकारसोबत उभं राहायला पाहिजे. जेणेकरुन तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतरणार नाहीत, असा चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला.

देशात सर्वाधिक चाचण्या या महाराष्ट्रात होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रुग्णालये उभारण्यात आली आहेत. कोणत्या राज्याशी तुलना करायची नाही पण, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था किती बिकट आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, मजुरांना घरी जाण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पैसे देण्यात आले. केंद्र सरकारकडे जी मदत मागितली, ती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही, असा आरोप पाटील यांनी केंद्र सरकारवर केला.

ट्रेंडिंग बातम्या-

सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या