बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’; चक्का जाम आंदोलनावरुन जयंत पाटलांचा सणसणीत टोला

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपकडून आज सकाळपासून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्रात विविध ठिकाणी भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलनं चालू आहेत. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या आंंदोलनावरुन विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट करत आज चालू असलेल्या चक्का जाम आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. जयंत पाटील म्हणाले की, राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’.

दरम्यान, मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर देखील भाजपच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. परंतू, काही वेळातच पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन हे आंदोलन होऊ दिलं नाही. यावेळी प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरातून नेतृत्व करत आहेत. तर, रावसाहेब दानवे जालन्यातून आंदोलन करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

चिंता वाढली! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढेच

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराच्या अडचणीत वाढ!

…तर मी राजकीय संन्यास घेईल- देवेंद्र फडणवीस

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील”

लग्न चालू असताना सहाव्या फेऱ्यानंतर ती थांबली अन् म्हणाली….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More