बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील!

सोलापूर | पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भागीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारसंघात येऊन गेल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मंगळवेढ्यात सभा घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत नाना भालके विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे अशी चुरशीची लढत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवेढ्यात सभेसाठी आले असताना या सभेला पावसानेही हजेरी लावली.

मंगळवेढ्यात जयंत पाटील यांच्या सभेला पावसाने हजेरी लावल्यानंतर शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती यावेळी पाहायला मिळाली. पाऊस सुरू झाल्यानंतरही जयंत पाटील यांनी व्यासपीठ न सोडता आपली सभा आणि भाषण सुरूच ठेवलं. तसेच यासंबंधी ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी ‘पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूकीनिमित्ताने भगिरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता.’ अशा आशयाचं ट्विट करून पावसात भिजत विरोधकांवर टीकेची तोफ डागली असल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या

तृतीयपंथियांमध्ये खुनी खेळ, 55 लाखांची सुपारी देऊन दुसऱ्या गँगच्या म्होरक्याला मारलं!

राजेश टोपेंनी सांगितले टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

राज्यात कोणत्याही क्षणी लागू शकतो लॉकडाऊन; ‘या’ 6 गोष्टींची काळजी घ्या!

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More