बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला

मुंबई | महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात 2019 साली सत्तांतर झालं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार शाब्दिक वाद चालू आहेत. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं होतं. तेव्हापासून आणखीन अध्यक्षपदाचा प्रश्न सुटला नाही. अशात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार होती पण, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परवानगी न दिल्यानं निवडणूक घेता आली नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करून मतमोजणी करत होणार आहे. या पद्धतीनं निवडणूक होणार असल्यानं भाजपला दु:ख होत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

हात वर करत मतमोजणी होणार असल्यानं भाजपला कदाचित यात घोडेबाजार करता येणार नाही याचं दु:ख वाटत आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. लोकशाहीत पारदर्शकता आणि महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात आता राज्य विधानसभेच्या अध्यक्षाची निवड ही राज्यसभेच्या धर्तीवर होणार आहे. पण भाजपकडून या पद्धतीला विरोध करण्यात आल्यानं जोरदार वाद निर्माण झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”

“कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…” तीन तरुणांनी जाहीर केली भूमिका

Gold Price: सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मराठमोळा पुष्पा! अल्लू अर्जुनच्या मराठी ट्रेलरचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More