बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकांत दादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil) हे आपल्या वक्तव्यांनी राज्यात खळबळ उडवून देत असतात. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी लवकरच महाविकास आघाडी सरकार (MVA Government) पडणार असं वक्तव्य केलं होतं. तर आता देवेंद्र फडणवीस (Fadanvis) लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा असल्याचं वक्तव्य पाटील यानी केलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

आगामी काळात राज्यातील मोठ्या महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच राजकीय लढाई चालू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कोणतीच घाई नाही तर चंद्रकांत पाटील यांना घाई आहे. पण चंद्रकांत दादांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीतही नाही, अशी खरमरीत टीका जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. राज्यातील जनता सुद्धा फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पहायला आतुर झाली आहे, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या अगोदरही सरकार स्थापनेबाबत अनेक वक्तव्य केली आहेत. चंद्रकांत पाटील यांची राज्याच्या राजकारणातील हसतमुख नेता ही ओळख बनली आहे.

थोडक्यात बातम्या 

“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे”

Share Market: लाखाचे केले 66 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

दिलासादायक बातमी! Omicron बाबत आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

“…तर राज्यात लाॅकडाऊन लावावं लागेल”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राज्यात आढळला Omicronचा पहिला रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More