अमरावती | महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे चंद्रशेखर भोयर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भोयर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी सांगितलं.
अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या चंद्रशेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही, असंही शिवाजीराव गर्जे यांनी स्पष्ट केलं आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर भोयर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, चंद्रकांत पाटील हे तर बावचळलेत- अजित पवार
“विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न”
आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापलं!
‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं
Comments are closed.