Top News

‘आप’चे दोन आमदार गळाला लागताच जयंत पाटील म्हणतात, दिल्ली अभी दूर नही!

नवी दिल्ली | आम आदमी पक्षावर नाराज असलेले आमदार फतेह सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कमांडो सुरिंदर सिंह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

जयंत पाटलांनी ‘दिल्ली अभी दूर नहीं…’, असं ट्विट करत भविष्यात दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत. हा वटवृक्ष आणखी बहरो!, असं म्हणत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांचं स्वागत केलं आहे.

राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत फतेहसिंह आणि सुरिंदरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेनेने सदैव इंदिरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मर्दानगीचा आदर केला”

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’; काँग्रेसच्या राऊतांचा शिवसेनेला इशारा

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या