बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचं काम दिलं होतं, असा धक्कादायक आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. यानंतर जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान

उठसुट राजीनामा मागणं असा उद्योग विरोधकांचा सुरु झालाय- संजय राऊत

“राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की…”

ना अजित पवार, ना जयंत पाटील; शरद पवार आपल्या ‘या’ विश्वासू माणसाकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

भाजीवाल्या ‘पांडेजीं’चा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More