बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती”

मुंबई | 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं आवश्यक असतं. 2004 मध्ये राष्ट्रवादीला 72 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असं आजही वाटतं, असं जयंत पाटील म्हणाले.

ज्यावेळी ही घटना झाली तेव्हा फार मतांतरं होती आणि प्रतिमेवर काहीसा परिणाम झाला. पण त्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या मागे उभे राहिले. अजित पवारही आज एकत्रितपणे काम करत आहेत. मागचं सगळं विसरुन सगळे एकत्र काम करत आहोत. ज्या घटना घडल्या त्यावर मात करुन एकजीवानीशी काम केलं जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांतदादा आमचे कोल्हापूरवाले. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे. परंतु त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्याला जवळ केलं हे आम्हालाही आवडलेलं नाही, पुणेकरांनाही आवडलेलं नाही आणि कोल्हापूरकरांना तर अजिबातच आवडलेलं नाही, असा टोला जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’; आनंदराव अडसूळ आक्रमक

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी!

‘…म्हणून मी कर भरला नाही’; कंगणाने कर न भरण्याचं दिलं ‘हे’ कारण

“अन्यायकारक कायद्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला; राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More