अहमदनगर | एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेनी आपली भुमिका स्पष्ट केलीय. हायकोर्टात देखील यापुर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं, असंही जयंत पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले…
केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ- अरविंद केजरीवाल
भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई
“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”
“धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना हक्क नाही”