महाराष्ट्र मुंबई

आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे; चालू प्रकल्प बंद करणार नाही- जयंत पाटील

मंबई | आम्हाला महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल त्यानंतर निर्णय घेतले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचं नाही अशी आमची वृत्ती नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहे. कोणत्या गुन्ह्यामध्ये  जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या