सांगली | संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. यावर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
जे पुरावे समोर येतील त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. या प्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 1 जानेवारीला पुण्यात दिली होती.
थोडक्यात बातम्या-
“14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही
“दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं”
“मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा अनेकांनी विडाच उचलला होता, पण…”
खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार
जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले