Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पुत्रीप्रेम आणि पुत्रीप्रेमापोटी मत मागत असल्याचा दावा केला होता. त्यावर आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य करत अजित पवारांना चांगलंच सुनावलं आहे. त्यानंतर त्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे निवडून येणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
“पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हे आरोप खोटे”
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, पुत्रीप्रेम आम्हाला कधीच अनुभवायला मिळालं नाही. सुप्रिया सुळे या तीन टर्म खासदार आहेत. मात्र तेव्हा त्यांना एकदाही मंत्रीपद दिलं नाही. त्यावेळी शरद पवारसाहेबांनी दुसऱ्यांना संधी दिली, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात होते तेव्हा आम्ही आदित्य ठाकरे यांना काम करताना पाहिलं आहे. उद्धव ठाकरे हे कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचे. तेव्हा आदित्य हे निर्णय घेण्यासाठी आणि चर्चा सत्रात कधीच नसायचे, यामुळे पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हे आरोप खोटे असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.
जयंत पाटील म्हणाले आहेत की, यंत्रणांचा गैरवापर होताना दिसत आहे. महागाई वाढत असल्याने दिल्ली सराकार पाडायचं आहे. यामुळे आता मतदारांनी पक्क डोक्यात ठेवलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
सांगलीतल्या जागेवरून जयंत पाटील यांना धारेवर धरण्यात आलं होतं. त्यावरून आता जयंत पाटील यांनी हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की आरोप करणाऱ्याला त्याच्या भागात किंमत नाही त्यावर मी काय उत्तर देऊ?, असं जयंत पाटील म्हणाले होते. 48 मतदारसंघातून एका मतदारसंघात एखादी घटना घडल्यानंतर आमच्यात एक वाक्यता नसल्याचा निष्कर्ष काढण्याची गरज नाही. सांगलीमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
“बारामतीत सुप्रिया सुळे निवडून येणार”
बारामती आणि सांगलीत प्रतिष्ठेची लढाई आहे असं बोललं जात असल्याचं जयंत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा, बारामतीत 100 टक्के महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचं जंयत पाटील म्हणाले आहेत. कोणी केली प्रतिष्ठेची लढाई? दुसऱ्यांची प्रतिष्ठापणाला लागणार असल्याचं जयंत पाटील सत्ताधाऱ्यांना म्हणाले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून येणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
पूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण यात काय फरक आहे? असा सवाल जेव्हा जयंत पाटील यांना केला असता. त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ज्यावेळी पराभवाची भीती असते तेव्हा खर्च वाढवला जातो. निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला आहे. निवडणूक आयोग डोळे बंद करून होते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
News Title – Jayant Patil Talk About Supriya Sule 100 Percent Win In Baramati Loksabha
महत्त्वाच्या बातम्या
कार्तिकी गायकवाडच्या घरी आला नवा गोंडस पाहुणा; कार्तिकी रोनित झाले आई-बाबा
‘या’ 2 लोकांसोबत मैत्री म्हणजे पैशांची बरबादी!
‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
भर कार्यक्रमात जया बच्चन असं काही बोलल्या, ऐश्वर्या रायला थेट रडूच कोसळलं, Video होतोय Viral
ॲम्बुलन्स आणि पाण्याच्या टँकरमधूनही पैशांचं वाटप?; रोहित पवारांच्या दाव्यामुळे राज्यभर खळबळ