बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘मी पुन्हा येईल’, हे मी गेल्या अडीच वर्षापासून ऐकतोय, सत्यात कधी येणार तुम्हीच सांगा”

अहमदनर | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ‘मी पुन्हा येईल’ हे वाक्य चर्चेत राहिलं. एका सभेत बोलताना, मी पुन्हा येईल, असं म्हटलं होतं. यावरून फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यासोबतच त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

‘मी पुन्हा येईल’, हे वाक्य मी गेल्या अडीच वर्षापासून ऐकत आहे. मात्र ते सत्यामध्ये कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं, असं म्हणत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. ते शिर्डीमध्ये रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पाटील आले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपावर ईडी आणि इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा?, असा सवालही जयंत पाटलांनी केला आहे. लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात असून लोकांपर्यंत जाण्याची गरज असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. यावेळी बोलताना पाटलांनी मंत्री छगन भुजबळांवरही भाष्य केलं.

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी छगन भुजबळांच्या नेतृत्त्वाखाली चांगलं काम झालं आहे. त्यासोबतच भुजबळांच्या कल्पकतेमुळे आरक्षण वाचवण्यात यश आलं असल्याचं पाटलांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली अन्…; UPSC देणाऱ्या विद्यार्थिनीचे गंभीर आरोप!

‘या नेत्यासोबतची मैत्री आणि विश्वासच लोकशाहीचा सर्वात मोठा विजय’; काॅंग्रेसच्य मुख्यमंत्र्यांचं मोदींकडून कौतुक!

“परमबीर सिंह यांना वाचवणं भाजपसाठी गरजेचं आहे”

“रस्ते बांधणं म्हणजे ‘रॉकेट सायन्स’ नाही, ठाकरे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत…”

स्पर्धा परीक्षेचा आणखी एक बळी! अपयशानं विद्यार्थ्यानं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More