मुंबई | देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरं काहीही काम नाही. त्यातच त्यांच्या मनासारखं काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असं म्हणत राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील बैठक पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांना आता याच्याशिवाय दुसरं काही काम आहे का?, ते बिचारे अस बोलणारच. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानभुती आहे. ताळमेळ नसल्यामुळं आमचं सरकार काळ टिकणार नाही मात्र आमचं सरकार थोडं-थोडं दिवस करून पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचंही, जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेल नसल्यानं हे सरकार फार काळ टिकणार नसल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. पालघरच्या भाजप मेळाव्यात तो बोलत होते. यावर जयंत पाटलांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
दरम्यान, खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटतात काहीही अडचण नाही. मुख्यमंत्री खातेवाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्यानं दिली आपल्या प्रेमाची कबुली; पाहा कोण आहे ती… – https://t.co/nSM5xHFr2G @hardikpandya7 @Natasastankovic #HardikPandya
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
“शिवसेनेचं म्हणजे दिवसा शेर आणि रात्री ढेर”- https://t.co/dTt3QniXW0 @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
मंत्रिपद न दिल्याने ‘हा’ काँग्रेस आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?- https://t.co/93Nmru32d4 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.