बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं नाही तर नरेंद्र मोदींचं”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर शिवसैनिकांनी आंदोलन छेडलं आहे. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना राणेंसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसे सहकारी निवडले आहेत त्याची छोटीशी चुणूक राणे यांच्या वक्तव्यावरून राज्याला आणि देशाला कळली आहे. त्यासोबतच नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं नसून नरेंद्र मोदी यांचं आहे, असं समजावं लागेल कारण राणेंनी त्यांनीच मंत्री केलं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राणेंचं बिलकुल समर्थन करु शकत नाही. एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठिशी उभा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  नारायण राणे यांना अटक झाली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आता पुढे काय होणार याकडे सर्व राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात

मोदी एक्सप्रेसनं करा मोफत प्रवास, जेवणही मिळणार मोफत, पाहा व्हिडीओ

केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कायदेशीर कारवाई होणारच- संजय राऊत

“उद्धव ठाकरे आमचे दैवत, आम्ही त्यांच्यासाठी हजार काठ्या खाऊ”

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More