अकोला | मुठभर भांडवलदारांचा विचार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून ते शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीपरिसंवाद यात्रेत पाटील अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर त्यांनी टीका केली आहे. अकोल्यामध्ये अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांचा सामना करायचा आहे म्हणून आपलं संघटन मजबूत करा, असं आवाहन जयंत पाटलांनी केलं.
दरम्यान, मला विश्वास आहे की पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल. आपल्याला महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा आहे. सोबत काँग्रेस आणि सेना आहेच, महाविकास आघाडीच्या कोणत्या नियमांना धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस कशी मोठी हाईल याचा आम्ही प्रयत्न करू, असंही पाटील म्हणाले.
#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेदरम्यान अकोला येथे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी पत्रकार परिषदेत सद्य स्थितीतील विविध प्रश्नांवर मत व्यक्त केले. pic.twitter.com/oCI6RGvTam
— NCP (@NCPspeaks) February 7, 2021
थोडक्यात बातम्या-
‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक
भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय- नरेंद्र मोदी
“बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली”
शेतकरी आंदोलनावर मिया खलीफाचं पुन्हा ट्विट, म्हणाली…
“वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?”