मुंबई | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक झाली आहे. याच मुद्यावरून मलिकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जावयानं काही गुन्हा केला असेल तर कायद्यानं योग्य ती कारवाई होईल. त्याच्या चुकीची शिक्षा सासऱ्यानं का भोगावी, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
नवाब मलिक यांच्या जावयानं काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे हे मला माहीत नाही. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, जावयाचं कुटुंब स्वतंत्र असतं. जावयानं काही गुन्हा असेल तर सासऱ्याच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याचं कारण नाही, असंही पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….
व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती!
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!
“धनंजय मुंडे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”
क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजप खासदाराला हनुमा विहारीचा रिप्लाय, सेहवागला हसू आवरेना