बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

मुंबई | शिवसेनेच्या (Shivsena) 40 आमदारांचा पाठिंबा मिळवत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे व शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा दौरा करत महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पाडले व शिंदे गट व भाजपच्या युतीचं शिंदे सरकार सत्तेत आलं.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप जूगारून विधानसभा अध्यक्षाच्या निवडीत व बहुमत चाचणीत देखील पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असताना शिंदे गटातील आमदारांकडून राष्ट्रवादीवर (NCP) देखील टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या प्रकरणी खंडपीठाचे कामकाज सुरू होईल. त्यातून सर्वाचाच उलगडा होईल. याला थोडा वेळ लागेल पण देर है अंधेर नही म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे. तर हा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, असं भाकीत देखील जयंत पाटलांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदेंसोबर फुटले. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर पक्षाच्या नावापासून ते निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणापर्यंत शिवसेना व शिंदे गटात जुंपलेली पाहायला मिळत आहे. यावर निर्णय देण्यासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवावे लागेल, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

“ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं हे कुठून शिकलात?”

“केसरकर लायकी पेक्षा जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती”

बॉयफ्रेंडसाठी तरूणींमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

‘येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर…’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More