बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांच्यावर आधी आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल”

अहमदनगर | ज्यांच्यावर आधी वेगवेगळे आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil) यांनी भाजपला लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

महाराष्ट्रात जी उलथापालथ झाली त्यात भाजपाचा पुढाकार असून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मत तयार झालंय, त्याचा परिणाम सर्व्हेत दिसून आलाय. जे सरकार आता स्थापन झालय त्या विरोधात जनतेचा सूर आहे. हे सरकार ओढून ताणून तयार झालेलं सरकार आहे. कोणालाच अपेक्षा नव्हती ते सरकार झालंय, असं जयंत पाटील म्हणालेत.

मंत्रिमंडळाची वाट बघत महाराष्ट्र 40 दिवस थांबला. आता खातेवाटपाची वाट बघत 8 – 15 दिवस थांबलं तर काय बिघडणार आहे असं त्यांना वाटतं, असा टोला देखील जयंत पाटील यांनी खातेवाटपाला होणाऱ्या वेळेवरून लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शिंदे सरकारच्या स्थापनेबाबत पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

माजी आमदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय

मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी…- भगतसिंह कोश्यारी

‘…त्यासाठी मुलींना कुणासोबत तरी झोपावं लागतं’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

‘जालना मतदारसंघ माझ्या बापाचा नाही, पण खोतकरांसाठी…’; दानवेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More