बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वारसा प्रबोधनकारांचा विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी मुंबईत उत्तर सभा घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांवर सडकून टीका केली.
जयंत पाटील नेहमी चकीतचंदू असतात, त्यांना काहीच माहिती नसतं, असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. तर राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला होता. जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात, या राज ठाकरेंच्या टीकेला जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी (Jayant Patil) सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा विचारसरणी मात्री नथुराम गोडसेची. पुतण्या मा.बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचे विचार संपवणाऱ्या लोकांशी, असा घणाघात जयंत पाटील केला आहे. जयंत पाटलांनी ट्विट करत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, 2014ला मोदींना पाठिंबा, 2019ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असं म्हणत जयंत पाटलांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“जोपर्यंत RCB जिंकत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही”

जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाले…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! CNGच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More