बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांना 2024ला सर्वात मोठी भेट द्यायचीये, कामाला लागा”

पुणे | राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा पाचव्या दिवशी पुण्यातील मावळमध्ये पोहोचली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना 2024ला शरद पवारांना सर्वात मोठी भेट द्यायची असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

तळागाळातील कार्यकर्त्यांच्या काही समस्या, पक्षाकडून काही अपेक्षा असतील त्या समजून घेण्यासाठी परिसंवाद यात्रा सुरू करण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे आहेत आणि ते काम तुम्ही आम्ही करायचे म्हणत जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आदेशच दिले आहेत.

महाराष्ट्रात 2024ला निवडणुकांमध्ये सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द तुमच्यात हवी. शरद पवार यांनी उभं आयुष्य वेचलं. आजही ते 24 तास काम करतात. त्या शरद पवारांना 2024 साली सर्वात मोठी भेट द्यायची आहे. 2024ला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, कोण फुटत नाही म्हणून मंत्र्यांवर धाडी सुरू केल्या आहेत. दाऊद, दहशतवाद असा गाजावाजा करणार आणि मंत्र्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. पण दिल्लीश्र्वरांसमोर महाराष्ट्र कधीही झुकला नाही, अशी टीका जयंत पाटील केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“हे पाकिस्तानी समर्थकांचे मंत्रिमंडळ, असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही”

“मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे यांचं उपोषण सोडवावं”

फोन टॅपिंग प्रकरणात गृहमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, राज्यपाल कोश्यारींनी दिले ‘हे’ आदेश

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More