बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जयंत पाटलांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!

मुंबई | बुधवारी अचानक राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यात सोडून बाहेर पडले. त्यानंतर ते थेट ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि रुग्णालयात जाण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर बैठकीत खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यास सांगितलं. त्यानंतर ते ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांची तपासणी करून उपचार सुरू केले. त्यानंतर जयंत पाटलांनी ट्विट करत आपली प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं होतं. तर अफवांवर विश्वास ठेऊ नका असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट नाॅर्मल आले आहेत. मात्र, त्यांच्या इसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 2 डी इको आणि त्यांची बल्ड टेस्ट देखील नाॅर्मल आहे. मात्र, त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील हे रक्तदाबाने आधीपासूनच पीडित आहेत. यापूर्वी त्यांची एका वाहिनीत किरकोळ ब्लॉक आढळून आला होता. सध्याही एका वाहिनीत किरकोळ ब्लाॅकेज असल्यानं शस्त्रक्रियेचा निर्णय डाॅक्टर घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर डाॅक्टरांनी त्यांनी विश्रांती करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू होणार?, राजेश टोपेंचं सुचक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More