बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवारसाहेब जिद्धीने लढले म्हणून आपल्याला यश मिळालं”

औरंगाबाद | राज्यात आगामी काळात महानगरपालिकासाठी निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडीमधील पक्ष या निवडणुका स्वंतत्र्य लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी राज्यातील पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची परिसंवाद यात्रा पैठणमध्ये पोहचली. त्यावेळी जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत महत्वाचं वक्तव्य केलं.

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांच्या मार्गदर्शनामुळे आलं असून, शिवसेना, काॅंग्रेस, आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस आज राज्यात एकत्र काम करत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनामध्ये समन्वय असायला हवा, सरकार म्हणून आपल्याला संपूर्ण मदत होईल, असं आश्वासनही जयंत पाटील यांनी दिलं आहे.

2019 च्या निवडणुकीत पक्षाची परिस्थिती बिकट होती, अनेक लोक पक्षाला सोडून जात होते. परंतु पवार साहेबांच्या झंझावती दौऱ्यांमुळे आपली संख्या 54 वर गेली. पवार साहेब जिद्धीने लढले आणि कार्यकर्ते एक झाले म्हणून आपल्याला यश मिळालं. पैठणच्या कार्यकर्त्यांनी यातून बोध घ्यावा, असंही पाटील म्हणाले,

दरम्यान, गेल्या काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून महाविकास आघाडीबाबत राजकीय चर्चांना उधान आलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये काय होतंय, ते आता पहाव लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?, आरोग्य भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले”

भाजप-मनसे युतीचा श्रीगणेशा! ‘या’ जिल्ह्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्याने ठोकला काँग्रेसला रामराम

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

“अडसूळांना अटक होताच आजारी पडले, आता मुश्रीफांना कोणीच वाचवू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More