“कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर…”, जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी
मुंबई | महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून वाद सुरू असताना आता एक नवीन वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी इस्लामपुरच्या सभेत ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
कन्यादानावर एका ठिकाणच्या प्रसंगाबाबत मिटकरींनी भाष्य केलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर जयंत पाटील देखील उपस्थित होते. मिटकरी यांचं ते वक्तव्य वैयक्तिक आहे. ते अशाप्रकारचं मत मांडत असतात. त्यांनी थेट ब्राम्हण समाजाचा उल्लेख केला नसला तरी ब्राम्हण समजाशी जोडलं गेल्यानं वाद वाढल्याचं पाटील म्हणाले आहेत.
मंत्रविधीच्या भाषणावर मी माईकवर टॅप करत बोलणं थांबवण्यास सांगितलं होतं, असं पाटील म्हणाले आहेत. ब्राम्हण समाजाला दुखावण्याचा आमच्या सभेचा हेतू नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय, असंही पाटील म्हणाले आहेत. मिटकरींनी मात्र माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमोल मिटकरीच्या वक्तव्यानंतर राज्यात ब्राम्हण समाजाकडून आंदोलन करण्यात आली. राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयाबाहेर आंदोलन करत असताना काहीसा गोंधळ झाल्याचं देखील दिसून आलं आहे.
थोडक्यात बातम्या –
महागाईवर ‘ऑल इस वेल’ म्हणणाऱ्या अर्थमंत्री सीतारामण यांच्यावर राष्ट्रवादीची जोरदार टीका!
“मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणारच…”, नवनीत राणा कडाडल्या
शेतकऱ्यांनो… कामं उरकून घ्या! मराठवाड्यासह राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता
“नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या”
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
Comments are closed.