बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल

मुंबई | परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण तापलं असताना अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील मास्टरमाईंड महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत, असं पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तत्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी हे स्वत: गृहमंत्रालयाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. किंवा परमबीर सिंग यांनी तशी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, असं जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत

शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”

“जो न्याय शिवसेनेच्या मंत्र्याला लावला तो न्याय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला लावणार का?”

दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More