मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली आहे.
पवार हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार आणि अजित पवारांची 600 कोटींची केस बाहेर काढली त्याचा बदला घेण्यासाठी सदावर्ते यांना अटक करण्यात आल्याचा गंभीर आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. काही झालं तरी आम्ही लढणार ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या पतीला अटक केली ती चुकीची आहे, असं पाटील म्हणाल्या आहेत.
फक्त आणि फक्त टार्गेट करण्यासाठी गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली आहे, असंही पाटील म्हणाल्या आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यापासून गुणरत्न सदावर्तेंच्या जिवाला धोका आहे, असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या परिणामी सदावर्तेंवर केस दाखल करण्यात आली आहे, असंही पाटील म्हणाल्या आहेत.
दरम्यान, जयश्री पाटील यांच्या गंभीर आरोपानंतर राज्यातील वातावरण तापलेलं आहे. सदावर्तेंना न्यायालयानं दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी
“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”
“एवढं काम करतोय की काम करून करून…”; अजित पवारांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
“पवार कुटुंबानं महाराष्ट्राला विकत घेतलं आहे का?”; निलेश राणेंचा खोचक सवाल
“…तर धोनीच्या संघाचं काही खरं नाही”; दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Comments are closed.