“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Jayashree Thorat | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सगळीकडे प्रचार सुरु आहे. दरम्यान यावेळी सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देशमुख?

संगमनेर मतदारसंघातील धांदरफळ येथे युवा संकल्प सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलत असताना वसंतराव देशमुख यांची जिभ घसरली. बोलत असताना देशमुख म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांची नात ती तर बोलती म्हणत्यात, माझा बाप सगळ्याचा बाप काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे.

मुलगी बाहेर पडू शकणार नाही-

देशमुख एवढंच नाही बोलले तर, पुढे ते म्हणाले की, आपल्या कन्येला समजवा. जर आम्ही मैदानात उतरलो तर, तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजय दादा प्रेमाने तिला ताई (Jayashree Thorat) म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं देखील वसंतराव देशमुख म्हणाले.

पोलिसांना पत्र-

संगमनेरमध्ये घडलेल्या प्रकारणानंतर, महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाचा मी जाहीर निषेध करते. अहिल्यानगरच्या पोलिसांना पत्र लिहित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांबाबत कुणी अशी विधानं करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाहीत, असं चाकणकर म्हणाल्या आहे.

News Title : jayashree thorat gets trolled by vasantrao deshmukh

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीतील सर्वजण मिळून अमित ठाकरेंना विजयी करू; भाजप नेत्याचं मोठं विधान

अजित पवारांच्या ‘या’ नेत्यापासून भाजप दोन हात लांब राहणार!

फडणवीसांची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क

“सुजय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल”; शालिनीताई विखे संतापल्या

देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होणार का?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .