मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल सध्या विविध चर्चा रंगत आहे. अजित पवार (Ajit Pawar) केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नागपूरच्या वज्रमूठसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंचावर अजित पवार यांच्यासमोर शायरीतून मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
उद्धवजी मला एक आपल्याला एक सांगायचं आहे, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, युहीं कोई बेवफा नहीं होता. काहीतरी अडचण असेल. कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी प्रोब्लेम असेल, अब समज लो, अब क्या करोंगे? पण महाराष्ट्रातील जनता या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.
मला खात्री आहे, उद्धवजी तुम्हाला कुणीही सोडून गेलं असलं तरी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना जे स्थान मातोश्रीला पूर्वी होतं ते स्थान आजही राहिलेलं आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-