बीड | बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
गेले अनेक दिवस जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीवर नाराज होते. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेक दिवसांपासून जोर धरत होत्या.
लढा… वादळात ज्या दिव्यांची काळजी घेतली, तेच दिवे आता चटके देत आहेत, असं जयदत्त क्षीरसागर यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रितम मुंडेंना साथ द्या, असं आवाहन केलंय.
दरम्यान, पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीत बळ मिळत असताना जयदत्त क्षीरसागर यांना डावलले जात असल्याची भावना आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लालूंच्या विरहाने राबडीदेवी व्याकूळ; कवितेच्या माध्यमातून लालूंवर प्रेमाचा वर्षाव
-लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करू नका, 600 कलाकारांचं भारतीयांना आवाहन
-लग्नानंतर मी माझा धर्म बदलला नाही; नवरा मुस्लिम-मी हिंदू… उर्मिलाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
-‘कोण होतास तू काय झालास तू!’ भाजपचा राज ठाकरेंना चिमटा
-गडी भारीए… पाहिजेल ते करतो आणि रोज माझं बोट धरतो; पवारांची मोदींना कोपरखळी
Comments are closed.