औरंगाबाद महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार??

बीड | भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे विधिमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी धस यांच्या भाषणाला दाद दिल्याचे आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले.

बीड नगरपालिकेच्या विकास कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हा प्रसंग पाहण्यात आला.

सचिन धस क्रिकेटर असला तरी सुरेश धसांनी जोरदार चौकार-षटकार ठोकले, त्यांचे चेंडू सिमापार गेले, अशी दाद क्षीरसागर यांनी दिली. त्यामुळे क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार की काय अशा चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, सुरेस धसांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आमचा जूना पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) दोन रुपयांचाही निधी देत नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-राधाकृष्ण विखेंची पुतणी देणार स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला

-मोदी फकीर, त्यांना महागाई कशी कळणार?- अजित पवार

-माझी पुन्हा फसवणूक केल्यास, सरकारला उघडं पाडू- अण्णा हजारे

सत्तेसाठी अर्धकमळ छातीवर लावून फिरतील; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

-नरेंद्र मोदी ‘जुमला राजा’ आणि त्यांची राजवट ‘चौपटराज’- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या