महाराष्ट्र मुंबई

गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी

मुंबई | एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली  आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या प्रीतम मुंडेचा प्रचार करून राष्ट्रवादीला धक्का दिला होता. यानंतर राष्ट्रवादीवरची नाराजी बाहेर काढत क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नेमकं कोणतं खातं दिलं जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद

-4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री!

-फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू

-भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

-उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येला रवाना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या