औरंगाबाद महाराष्ट्र

“जयदत्त क्षीरसागर माझ्याकडे आले आणि मी त्यांना ‘एवढे’ कोटी रुपये दिले”

बीड | राष्ट्रवादीचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर माझ्याकडे आले आणि म्हणाले, मला बीडचा चेहरामोरा बदलायचा आहे, त्यासाठी मी त्यांना 495 कोटी रुपये दिले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते बीडमध्ये बोलत होते.  

मोदी सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. बीडकरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

कोणताही गरीब कच्च्या घरात राहणार नाही. ग्रामीण भागात पाच लाख घरं पूर्ण झाली आहेत. राष्ट्रवादी विकास करतं नाही फक्त राजकारण करतं, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राष्ट्रवादीतली अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर आलेली दिसून येत आहे.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या