‘कोरोना’काळातही काका-पुतण्यांमध्ये जुंपली; होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागर म्हणाले…
बीड | ‘कोरोना’काळातही शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यांमधील संघर्ष समोर आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर आपण मुंबईहून नव्हे, तर औरंगाबादहून बीडला परतल्याचं स्पष्टीकरण जयदत्त क्षीरसागर यांनी दिलं आहे.
संचारबंदीच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी मुंबई ते बीड असा प्रवास केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्या गटातील नगरसेवकांनी जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाइन करा, अशी मागणी केली होती.
जिल्हाबंदीचे आदेश असतानाही जयदत्त क्षीरसागर यांनी प्रवेश केला कसा? असा सवाल उपस्थित करुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनसेवा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कालचा प्रकार हा बालिशपणाचं लक्षण आहे, असा टोला जयदत्त क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांचं नाव न घेता लगावला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोना बरा होण्यासाठी दररोज गाढविनीचं दूध प्या; या नेत्यानं तोडले अकलेचे तारे
“मोदी द्वेषापोटी केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य ठाकरे सरकार वाटत नाही”
महत्वाच्या बातम्या-
‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’; पाकिस्तानने केली भारतीयांची प्रशंसा
“दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षा आता रद्दच करा”
कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!
Comments are closed.