Top News

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यांमध्ये रंगली टस्सल; पाहा कुणी मारली बाजी…

बीड | नगरपालिकेच्या एका जागेसाठी बीडमध्ये जोरदार टस्सल पहायला मिळाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांनी बाजी मारली. 

एका जागेसाठी लढत असली तरी राष्ट्रवादीचे नेते असलेले मात्र एकमेकांचे विरोधी असलेले राष्ट्रवादीचे काका-पुतणे जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात ही प्रमुख लढत होती. 

संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे आपली सगळी ताकद उभी केली होती. तर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने शेख समीरा बेगम खमर यांची उमेदवारी दिली होती. 

प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये झालेल्या या लढतीत मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांना ११३९ मतं मिळाली तर शेख समीरा बेगम खमर यांना ७५४ मतं मिळाली. काका-पुतण्याच्या लढाईत पुतण्या वरचढ ठरल्याचं पहायला मिळालं. 

महत्वाच्या बातम्या-

-जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर चिडतो… 

-आता मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली- चंद्राबाबू नायडू

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार कन्येचा पराभव

-परिवर्तन करायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत राडा

-कुमारस्वामींनी दिली मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या