बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी 12 जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. हर्षवर्धन यांचाही समावेश आहे.  डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉ. हर्षवर्धन यांना मोदी सरकारकडून ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. बिचारे डॉ. हर्षवर्धन… उच्च स्तरावरच्या स्मारकीय अपयशासाठी एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह 12 केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी यांचीही नावे आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन 43 मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये 15 जणांनी कॅबिनेट तर 28 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर…’; अभ्यासातून महत्वाची माहिती आली समोर

“दिलीप कुमार नसलेली चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे नसलेलं राजकारण”

टेनिस विश्वातील मोठी घटना; विम्ब्लडनचा ‘बादशाह’ रॉजर फेडररचा मानहाणीकारक पराभव

तीन पक्षाच्या सरकारमुळं भाजपला विस्ताराची मोठी संधी- देवेंद्र फडणवीस

जी जबाबदारी मिळालीये त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन- भारती पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More