‘राहुल गांधी फक्त मुलींच्याच कॉलेजला भेट देतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
तिरूअनंतपुरम | देशात सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस या निवडणुकांसाठी पुर्ण जोर लावताना दिसत आहे. भाजपने या प्रचारासाठी नेत्यांची मोठी फळी मैदानात उतरवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने निवडणुकांची जबाबदारी खासदार राहुल गांधी यांच्या खाद्यांवर सोपवली आहे. याच प्रचारादरम्यान, डाव्यापक्षातील माजी खासदार जाॅएस जाॅर्ज यांनी राहुल गांधींवर खालच्या दर्जाची टीका केली आहे.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन अशा प्रकारे केलं जातं की, ते केवळ मुलींच्याच काॅलेजला भेट देतात. तेथे ते मुलींना वाकण्यासंदर्भात शिकवतात. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर वाकून उभं राहू नये. त्यांचं अजून लग्न झालं नाही, असं वक्तव्य जाॅर्ज यांनी केलं आहे.
सीपीआयचे उमेदवार आणि नेते एम एम मनी यांच्या प्रचारासाठी आयेजित केलेल्या एका सभेत त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. लेफ्ट डेमोक्राॅटिक फ्रण्टच्या पाठिंब्यावर जाॅएस जाॅर्ज हे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा वेळोवेळी लेफ्ट डेमोक्राॅटिक फ्रण्टला पाठिंबा राहिला आहे.
दरम्यान, सीपीआयला केरळमध्ये पराभव दिसू लागल्याने अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत असं, काँग्रेसने ट्विट केलं होतं. तर काँग्रेसने या वक्तव्याचा निषेध देखील केला आहे. केरळमध्ये लेफ्ट आणि काँग्रेसमध्ये आलटून पालटून सत्ताबदल होत राहतो. त्यामुळे केरळमध्ये काँग्रेसला किती यश मिळेल हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.
थोडक्यात बातम्या-
मुंबईतील लॉकडाऊनसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘या’ बड्या खेळाडूनं वर्तवलं अशुभ भाकीत!
14 वर्षांचं प्रेम मात्र फक्त एक नकार आणि झाला रक्तरंजीत शेवट!
राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.