मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेरील हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटिल (Dilp Walse-Patil) यांच्यावरही घणाघाती आरोप केले होते.
गुणरत्न सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील प्रदिप घरत (Pradip Gharat) यांनी गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले. तर जयश्री पाटील फरार असल्याचंही घरत यांनी कोर्टात सांगितलं.
गुणरत्न सदावर्तेंच्या घराच्या टेरेसवर 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते अडीच वाजेपर्यंत एक मिटींग झाली होती. यावेळी सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील, अभिषेक पाटील व नागपूरची एक व्यक्ती होती. तर या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना जयश्री पाटील फरार आहेत. त्यामुळे त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे, असा खळबळजनक दावा प्रदिप घरत यांनी केला आहे.
दरम्यान, मिंटींगमध्ये असलेली ती नागपूरची व्यक्ती सर्व आंदोलन हँडल करत असल्याचा आरोपही घरत यांनी केला आहे. मात्र, नागपूरची ती व्यक्ती कोण आहे? याचा खुलासा सरकारी वकिल घरत यांनी आजही केला नाही.
थोडक्यात बातम्या-
रणबीरच्या आधी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं आलियाचं नाव
रेल्वेचा प्रवाशांना दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज
चक्क 1 रूपयांत मिळणार 1 लीटर पेट्रोल, जाणून घ्या कुठे मिळतीये ऑफर
अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची वर्णी
Comments are closed.