महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई | भाजपला सोडचिठ्ठी देऊन जयसिंगराव गायकवाड यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

17 नोव्हेंबरला मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीवाना दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मान, सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील?, असं जयसिंग गायकवाड यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे. एखाद्या कुख्यात अतिरेक्याने भाजपला ताब्यात घ्यावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका जयसिंग गायकवाड यांनी केलीये.

कुणाला साथ द्यायची, कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे. कामाचा पत्ता नाही. पण मी पणा भरपूर आहे. अशा लोकांशी कसं काम करायचं?, असा सवाल जयसिंगराव यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

“लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार असेल”

टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित-इशांत शर्मा पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून बाहेर

…तर ती कोणती मर्दानगी होती?- प्रवीण दरेकर

ठाण्यातील शिवसेनेच्या आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; निलेश राणेंचा आरोप

‘आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या’; संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या