महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

नवी दिल्ली |  लोकसभेचेच्या निकालाला फक्त 72 तास उरलेत. अशा परिस्थितीत संभाव्य निकाल लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या क्षणी ‘फ्रंटफूट’वर आल्या आहेत.

सोनियांनी शनिवारी बैठक घेत महत्वांच्या नेत्यांशी चर्चा केली. निवडणूक निकालापूर्वीच केंद्रात सत्ता स्थापण करण्यास जेडीएसने काँग्रेसला पाठिंबा दर्शविला आहे. तशी घोषणाच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभेला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने अधिक जागा असताना देखील एक पाऊल मागे घेत जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकार स्थापण झालं.

काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांना देशात सरकार स्थापण करणे अशक्य असल्याचं मतंही देवेगौडा यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदींनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही करु शकता बुकींग; त्यासाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे!

-राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांसंदर्भात अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

मोदी-ममता संघर्ष अजूनही सुरूच; मोदींच्या दौऱ्यातून आचारसंहिता भंगाचा तृणमूलचा आरोप

-चंद्राबाबू नायडू आणि तुमच्यात काय बोलणं झालं?? पवार म्हणतात…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार मुनीरत्न यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

Google+ Linkedin