बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”

मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर आता लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ द्या. युतीची ताकद वाढवा. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन, असा विश्वास राजकीय रणनितीकार म्हणून नावलौकिक असणारे आणि जदयूचे नेते प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर विशेष चर्चा केली.

उठसूठ पंतप्रधानांवर टीका करणे आपण टाळलं पाहिजे तसंच मोदी सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय आपण जनतेपर्यंत पोहचवले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी शिवसेना खासदारांनाही आगामी निवडणुकीसंदर्भात मोलाचा कानमंत्र दिला असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!

-महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या माथेफिरु पूजा पांडेला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More