Top News देश

NEET आणि JEE च्या परीक्षा पुढे ढकलल्या; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

दिल्ली | देशभरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतायत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्यात. तर आता देशभरात होणाऱ्या NEET आणि JEE च्या परिक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी होणारी NEET ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेतला आहे. ही परिक्षा आता 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर JEE ची परीक्षा आता 1 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी NEET आणि JEEची प्रवेश परीक्षा स्थगित करून पुढील तारखा घोषित केल्या आहेत. JEE main/ऍडवान्स आणि NEET 2020 परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आल्यात आहेत.  JEE Main ची परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या दिवसांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. JEE ऍडवान्स 27 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. त्याचप्रमाणे NEET ची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबर रोजी असणार आहे.

NEET आणि JEE या दोन्ही परिक्षा जुलैमध्ये घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्याने दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“दिल्लीत इतकं मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला?”

फडणवीसांचं स्वप्नभंग झालं म्हणूनच ते अशी वक्तव्यं करत आहेत

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

CA परिक्षेबाबत ‘हा’ मोठा निर्णय येण्याची शक्यता…!

जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा…., शासनाची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या