फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी जबरदस्त SUV लाँच; जाणून घ्या फीचर्स व किंमत

Jeep Meridian Launched l आजकाल तरुणांमध्ये नवनवीन कारची क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. तरुणांच्या क्रेझच विचार हा कार उत्पादक कंपन्या नेहमी करत असत. अशातच आता जीपने आपली सर्वात प्रसिद्ध एसयूव्ही जीप मेरिडियन भारतीय बाजारपेठेत एका अपडेटसह लॉन्च केली आहे.

किंमत काय असणार? :

कंपनीने जीप मेरिडियनमध्ये काही अपडेट्स दिले आहेत, ज्यामुळे ते मागील मॉडेलपेक्षा चांगले आहे. उत्तम डिझाईन आणि शक्तिशाली इंजिन असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 24 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टर सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करणार आहे.

बाजारात असलेल्या जीप मेरिडियनच्या व्हेरियंटमध्ये कंपनीने 5-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनसह दोन वेगवेगळ्या सीटिंग लेआउटसह एसयूव्ही सादर केली आहे. यामधील Longitude प्रकाराची किंमत 24.99 लाख रुपये आहे, Longitude Plus variant ची किंमत Rs 27.50 लाख आहे. तर Limited (optional) ची किंमत आहे Rs 30.49 लाख आणि Overland ची किंमत Rs 36.49 लाख आहे.

Jeep Meridian Launched l फीचर्स काय असणार? :

याशिवाय कंपनीने जीप मेरिडियनचे अधिकृत बुकिंग देखील सुरू केले आहे. जीप मेरिडियनमध्ये पूर्ण एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइन्स आणि सीट्स फोल्ड केल्यावर 824 लीटरपर्यंतची बूट स्पेस आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन जीप मेरिडियनमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे, जे 1750 ते 2500 RPM वर 3,750 RPMआणि 170 HP ची कमाल पॉवर आणि 2500 आरपीएमवर 350 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते.

जीप मेरिडियनमध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फुल एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, बिल्ट-इन नेव्हिगेशन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सारखी फीचर्स आहेत. तसेच या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

News Title : Jeep Meridian Launched

महत्वाच्या बातम्या –

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने केली सर्वात मोठी घोषणा!

ठाकरेंचे 53 शिलेदार ठरले?, पाहा कुणाला मिळालं तिकीट तर कुणाचा पत्ता कट?

पुणेकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी! आता यापुढे रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत…

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास

ये रिश्ता क्या केहलाता है?, रात्री 12च्या ठोक्याला दिलेल्या शुभेच्छांची खमंग चर्चा!