अरे व्वा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?

Meridian Edition l कारप्रेमींसामेरिडियनठी एक आनंदाची बातमी आहे. Jeep India ने भारतीय बाजारात नवीन Meridian X स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीने ही थ्री-रो एसयूव्ही स्टाइल आणि ॲक्सेसरीजमध्ये अपडेटसह बाजारात आणली आहे. जीप इंडियाने या स्पेशल एडिशन कारचे बुकिंगही सुरू केले आहे. मात्र कंपनीने हे मॉडेल मर्यादित संख्येत बाजारात आणले आहे.

नवीन ची स्पेसिफिकेशन काय?

मेरिडियन या कारला प्रीमियम लूक देण्यासाठी ग्रे रुफ आणि ग्रे पॉकेट्ससोबत अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. या स्पेशल एडिशन कारच्या केबिनमध्ये अनेक फीचर्सही जोडण्यात आले आहेत. जीप इंडियाच्या या कारला नवीन साइड मोल्डिंग, पुडल लॅम्प्स, सन शेड्स, एअर प्युरिफायर आणि डॅश कॅम देखील देण्यात आला आहे.

जीप इंडियाच्या स्पेशल एडिशन कारमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या स्पेशल एडिशन कारमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन दिले जात आहे, जे 168 bhp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. यासोबतच या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणार आहे.

Meridian Edition l किंमत काय असणार? :

मेरिडियन एक्स कार अवघ्या 10.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेते. या कारचा टॉप स्पीड 198 किमी प्रतितास आहे. स्पेशल एडिशन लाँच करताना जीप इंडियाचे ब्रँड डायरेक्टर कुमार प्रियेश म्हणाले की, जीप मेरिडियन कंपनीने या स्पेशल एडिशन कारची एक्स-शोरूम किंमत 34.27 लाख रुपये बाजारात आणली आहे. तुम्हालाही ही कार घ्यायची असेल तर या कारचे बुकिंग सुरू झाले असून या कारचे फक्त मर्यादित मॉडेल बाजारात आले आहेत.

कार निर्माता कंपनी मेरिडियन देखील नवीन आणि सुधारित मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत सादर केले जाऊ शकते. जीप इंडियाचे हे नवीन मॉडेल चाचणीदरम्यान अनेक वेळा स्पॉट झाले आहे. कंपनी याला सणासुदीच्या काळात लाँच करू शकते.

News Title : Jeep Meridian X Special Edition

महत्त्वाच्या बातम्या

…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा

इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो

अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?