‘या’ पक्षाच्या विष्ठेपासून जगातील महागडी काॅफी बनते!
नवी दिल्ली | चहा आणि काॅफीचं (Coffee) सेवन करणाऱ्यांची संख्या जगभरात प्रचंड आहे. अनेकदा चहा बेस्ट की काॅफी यावर वादविवाददेखील होतात. जगात अनेक वेगवगळ्या प्रकारचे काॅफी आणि चहाचे प्रकार असतात, मात्र तुम्हाला माहित आहे का की जगातील सगळ्यात महागडी काॅफी कशी बनवली जाते.
जगातील सगळ्यात महाग काॅफी ब्राजीलमध्ये (Brazil) बनवली जाते. ज्याची किंमत एका आयफोन इतकी आहे. ही काॅफी एका पक्षाच्या विष्ठेपासून (from feces) बनवली जाते. जाकू असं या पक्षाचं नाव आहे. याच्या विष्ठेपासून काॅफी बनवली जाते. या काॅफीची किंमत अमेरिकन डाॅलरमध्ये 1000 डाॅलर प्रतिकिलो आहे. भारतीय किमतीत तुम्हाला या 1 किलोच्या काॅफीसाठी 81,000 मोजावे लागतील.
ही काॅफी बनवण्यासाठी जाकू पक्ष्याची (Bird) विष्ठा शोधली जाते. त्यानंतर ती एकत्र केली जाते. त्या विष्ठेतून काॅफीच्या बिया बाजूल्या काढल्या जातात. त्या संपूर्णपणे स्वच्छ केल्या जातात. त्यानंतर त्या वाळवून, भाजून त्याची काॅफी पावडर बनवली जाते. या सगळ्या गोष्टी हाताने केल्या जातात. त्यामुळेच ही काॅफी महाग आहे.
2000 साली ब्राझीलच्या हेनरिक स्लोपर जी अराउजो या काॅफी बागायत दाराने काॅफीची सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या बागेत जाकू पक्षाने धुमाकूळ घातला होता. जाकू पक्षी मोठ्या प्रमाणात काॅफीच्या बिया खायचा. याचवेळी त्या बागायतदाराला लुवाक काॅफीची माहिती मिळाली ती मांजराच्या विष्ठेपासून बनवली जायची. याच कल्पनेनं हेनरिक स्लोपर (Heinrich Sloper) या काॅफी बागायत दाराने या काॅफीची सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.