Top News

‘या’ मोठ्या प्रश्नावर जॉर्ज फर्नांडिस यांनी राज ठाकरेंचे कान उपटले होते!

मुंबई |  आज सकाळी झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी नवी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या कामाने ते नेहमीच चर्चेत राहिले. असाच एक किस्सा आहे बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस आणि राज ठाकरे यांच्यातला.

2008 साली राज ठाकरेंनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यावेळी एनडीएचे संयोजक असलेले जॉर्ज फर्नांडिस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना एक पत्र लिहिल होतं. त्या पत्रातून राज यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली होती.

उत्तर भारतातून मुंबईत आलेल्या टॅक्सी चालकांवरील हल्ल्याप्रकरणी जॉर्ज यांनी राज ठाकरेंना जाब विचारला होता. तसेच हल्ला करणाऱ्या गुंडांना माफी मागायला लावा, असंही त्यांनी राज ठाकरेंना बजावलं होतं.

दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस त्यांच्या कामाने आणि कार्यशैलीमुळे जनसामान्यांच्या मनात कायमचं घर करून राहतील याबाबत कुठलीच शंका नाही.

महत्वाच्या बातम्या-

जॉर्ज फर्नांडिस यांनी देशातील कामगार चळवळीला नवी दिशा दिली- शरद पवार

ओवैसींना मोठा झटका, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोर्टाचे तपासाचे आदेश

“आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार आहेत”

-राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं वक्तव्य

-बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या