कर्जमाफीसाठी केंद्राने हात झटकले, राज्य सरकार मात्र समर्थ!

मुंबई | महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने मात्र राज्याला मदत करण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या राज्यांनी त्यासाठी स्वतः उत्पन्नाचे स्त्रोत शोधावेत, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय.

कर्जमाफीसाठी मदत मिळणार नाही, हे केंद्र सरकारनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आम्ही आमचा निधी उभारणार आहोत, असं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा